भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

माते बळिया शिरोमणी । कृष्ण नाटक हा विंदानी । आम्हां जळतजळतां वनीं । येणें रक्षिले निमिषाधें ॥१॥ आम्हां जाळित आला ओणवा । विराटरुपी हा झाला तेव्हां । मुखचि पसरुनीयां अघवा । प्राशन केला दावानळ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माथां मोरपिसें कुंडलें गोमटीं । कस्तुरी लल्लाटीं रेखिली दिसे ॥१॥ ह्रदयीं निकेतन श्रीवत्सलांछन । मूर्ती विराजमान शंख चक्र ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माया म्हणजे नसतेंचि दिसें । गगनीं जैसें दोनी चांद ॥१॥ असें एक भासे आणीक । तया नांव मायीक पसारा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मिरवी अंगीं अवतार लेणीं । विराजित कीर्ति भूषणीं । मुगुट कंडले कोटी तरणीं । तैसे तेज बंबाळ ॥१॥ कंठी शोभ्ला कौस्तुभमणि । पदकीं चरित्र रत्नाच्या खेवणीं । बाहुभूषणें दिव्याभरणीं । जडित कंकणेसुशोभित ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मिळालें गोपाळ बैसलें पाळीं । मध्यें वनमाळी विराजला ॥१॥ या रे म्हणती खेळ मांडू । विटीदांडू लगोरीचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मी ज्या बोलिलों निगुती । संतकृपेच्या त्या युक्ती ॥१॥ येरवीं हें काय जाणें । प्रसादाचें करणें त्यांचिया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मी तों दीन नेणें रंक । परि तुम्ही चाळक ब्रम्हांडा ॥१॥ केले अपराध क्षमा करा । काय म्यां दातारा विनवावें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मी तों नेणें व्यासवाणी । अर्थ गह्यार्थ जे जे पुराणीं । बोलीले कवी प्रासाद वाणी । तेही अर्थ मी नेणें ॥१॥ आपुलिये आवडीचिये भरीं । गौरविली म्यां हे वैखरी । श्रवण करावी हे चतुरीं । ऐशी नव्हेचि मुग्ध वाणी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मी मज माझीयाचा तुटला संबंध । ऐसा लाविला वो येणें मज वेध । जिविं जीवाचा हा मोडिल कंद । नुरे देहभाव ऐसा केला बोध वो ॥१॥ सखिये साजणी वो ऐके माझें गुज । याति पाहतां वो बोलतां सहज । नेलें हरुनियां अंतरींचें निज । पुढें नाचवि हा आपलेंचि भोज वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मी मज माझें याची केली वो निरास । वीण आपणा येणें आणियेला त्रास । नेदी आड येऊं दुजियाचा आभास । कैसें काय करुं सांगा मज यास वो ॥१॥ ऐसें जाजावोनी बोले एक नारी । हरीचा सुखानंद भरुनी अंतरी । लटिकाची वालभाचा भाव लोकाचारीं । दाऊनि एकांतीं हरिसी काम सारी वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मी माझें पाहतां न देखेचि दिठी । आदि मध्य शेवटीं विचारितां ॥१॥ टवाळ हें मिथ्या अविदयेचें भान । चेईलिया स्वप्न जैसें होय ॥२॥

रचनाकार: संत निळोबा