भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें तुम्हीं वांटिलें लोकां । सनकादिकां पर्यंत

magen tumhin vantilen lokan | sanakadikan paryant

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मागें तुम्हीं वांटिलें लोकां । सनकादिकां पर्यंत ॥१॥ अधम तेहि थोराविले । आपणा केले सारिखें ॥२॥ नाहीं विचारिली याती । धरिलें हातीं प्रीतीनें ॥३॥ काय त्यांचें क्रियाकर्में । कांही धर्म न विचारा ॥४॥ उदारपणा नाहीं सीमा । पुरषोत्तमा तुमचिया ॥५॥ निळा म्हणे सरतें पुरतें । केलें किती वर्णावें ॥६॥