भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

मग त्या मिळोनियां सकळ जनीं । मध्यें बैसवूनियां शारंगपाणी । भोंवत्या खेळविती खेळणीं । नाचती नाचणीं गीतस्वरें ॥१॥ कृष्णा म्हणोनियां आळविती । मधुर स्वरें गायनें गाती । तेणेंचि मिसें त्या कृष्णासि स्तविती । आणि रंजविती परमात्मया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग धांवोनियां यशोदा । हदयी आळंगी गोविंदा । बारे तूंतें अरिष्टेंचि सदा । जैं पासुनि जन्मलासी ॥१॥ प्रथम पूतनेचा घात । दुजा भटाचा विपरीतार्थ । तिजा कागाचा हा अनर्थ । आम्हीं देखिला समस्ती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग पाचारुनियां प्रांतवासी । व्दिज आणिले भोजनासी । जिताणें करुनियां श्रीकृष्णासी । ओंवाळिती अक्षवाणें ॥१॥ काळया सर्प स्थपिला वरी । कळंबातळीं यमुने तिरीं । देखोनि सोहळा तो नरनारी । करितीं आश्चर्य मानसीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग पाय ठेऊनि खांदियेवरी । चेंडा झेपावला हरी । ऐसें देखोनियां इतरीं । केला कल्लोळ खालुता ॥१॥ म्हणती रे नको नको हरी । जाऊं तिये खांदीयेवरी । आम्हां तुझी आई घरीं । गांजिल ऐसें करुं नकों ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग बैसवूनियां पाटावरी । ताटीं वाढिल्या नानापरी । दूध दहीं तूप साय वरी । शर्करा तेही ठेवियेली ॥१॥ कृष्ण म्हणे कालवी आतां । जेववीं मज तें वो जेवितां । येरी म्हणे परिसें ताता । रुचि त्याच्या भिन्न भिन्न ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग बोले मंजुळा उत्तरी । मज न्या जी गोकुळाभितरी । ठेवुनी नंदयशोदेच्या घरी । तुम्हीं यावे तेच क्षणी ॥१॥ ऐकोनी तयाचे उत्तर । वसुदेव विस्मित आणि चिंतातूर । म्हणे कैसा करावा विचार । बंधने गोविलें मजलागी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग म्हणती अवघ्या जणी धांवोनि पहागे आणा पाणी । डास वरखडला न्याहाळुनी । रक्त कोठुनी स्त्रवलें हो ॥१॥ पहाती तंव तो उत्तम अंगे । जेंवि का उठियलें अनंगे । नभापरी अलिप्त संगे । काय करिती अघात त्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग म्हणे गडियां आपण । उचलूं चला गोवर्धन । तयातळीं सकळही जन । घालुनियां संरक्षूं ॥१॥ मग ते उभे करुनि फेरी । धरविला त्यांचे हातें गिरी । आपणही तेथें निमित्यावरी । एकी आंगोळी लावियली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग म्हणे गिळिले गोप । गाई खिल्लारांचे कळप । तारि हा चिरुनियां सांडीन सर्प । घेईन सूड या सकळांचा ॥१॥ कृष्ण शिरतीं त्याच्या वदनी । अधासुरा हर्ष न समाय मेदिनी । म्हणे कार्य साधिलें हा चक्रपाणी । गिळिलियावरी सर्व माझे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग लाउनी शिंकियाच्या हारी । बैसल्या जागत आपुल्या घरीं । कवडाआड आणि माजघरीं । शिंकिया जवळी भोंवताल्या ॥१॥ पाटीये तळीं झांकोनी दीप । बैसल्या दवडोनियां झोंप । तंव हा सच्चिदानंदस्वरुप । आला चोरिये त्याचि घरां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग लेइले दिव्य अळंकार । उभयतांहि बंधु अति नागर । मुगुट कुंडले एकावळी हार । झळकती पदकें जडितांची ॥१॥ बाहूभूषणें वीरकंकणें । मुद्रिका अंगुळिया शोभल्या लेणें । वेष्टुनी पितांबराची परिधानें । घेतली निशाणें निजकरीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग वस्त्रें देउनी गौरविला । रायें बहूत सन्मानिला । चालतां मार्गी विचार सुचला । म्हणे टाकवीन तान्हुला निर्जनी ॥१॥ टिळे माळा टोपी शिरीं । श्रीमुद्रांची वोळी पंचांग करी । धोकटी घेउुनीयां खादियावरी । शुध्द मुहूतें चालिला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग सांगे गडियां सुजाणां । जातां कावडीं हिरोनि आणा । काय करितो देवराणा । पाहों चरित्र देवांचे ॥१॥ सें सांगोनियां गडियांसी । प्रात:काळींचि हषिकेशी । जाऊनियां मार्गप्रदेशीं । रोखूनियां बैसला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग सांगें गुह्य गोष्टी । मामा पाचारितो भेटी । इतुकेंचि ऐकोनियां पोटीं । कृष्णा आनंद न समाय ॥१॥ मग म्हणे बळिरामासी । जाऊं मामाचिये भेटीसी कृप करुनियां अक्रूरासी । मूळ आम्हांसी पाठविला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग हळूचि बोले अमृतवाणी । मागा म्हणोनी निजभक्तां ॥१॥ मुक्त होईन सेवाऋणा । घ्या हो वरदाना इच्छेच्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग होसोनियां बोलिजे कृष्णें । बेटे हो तुम्ही अवघेचि शहाणे । सर्पे गिळिले होतेती प्राणें । कैसे तरी वांचलेती ॥१॥ बरें झालें हातों मागें । तेणें वांचलेतीरे प्रसंगे । पैल पहारे महाभुजंगे । चिरुनी सांडिला त्याच्या फाळी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मज तों सांभाळिलें संती । धरिलें हातीं दीन म्हणुनी ॥१॥ सांगतां नये विश्वास लोकां । बाधी अशंका ज्याची त्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा