भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग लेइले दिव्य अळंकार । उभयतांहि बंधु अति नागर । मुगुट कुंडले एकावळी हार । झळकती पदकें जडितांची

mag leile divya alankar | ubhayatanhi bandhu ati nagar | mugut kundale ekavali har | jhalakati padaken jaditanchi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग लेइले दिव्य अळंकार । उभयतांहि बंधु अति नागर । मुगुट कुंडले एकावळी हार । झळकती पदकें जडितांची ॥१॥ बाहूभूषणें वीरकंकणें । मुद्रिका अंगुळिया शोभल्या लेणें । वेष्टुनी पितांबराची परिधानें । घेतली निशाणें निजकरीं ॥२॥ आधींचि मदनाचे हे बाप । दिव्य तेज प्रभा अमून । सकळहीं लावण्य सांटोप । धरुनियां आली निज वस्ती ॥३॥ अवघें चि सुख मुसावलें । कृष्णाकृति तें वोतलें नयना पाहुणेर देऊं आलें । जे जे देखती तयाच्या ॥४॥ कृष्ण लावण्याची मूर्ती । बळिदेवही तैसीचि आकृती । ठाणे माणें समान दिप्ती । प्रतापकीर्ति यशवंत ॥५॥ दंडी मुडपी विराजमान । शोभले राजीवलोचन । पाहों येती नागरिकजन । निळा म्हणे तया रामकृष्णासी ॥६॥