भजनी मालिका
← भजनांकडे परत

मच्छ कूर्म वराह झाला । नृसिंह वामन होऊनि ठेला

machchha kurma varah jhala | nrusinh vaman houni thela

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मच्छ कूर्म वराह झाला । नृसिंह वामन होऊनि ठेला ॥१॥ तो हा विटे सौम्यरुप । कोटी कंदर्पाचा बाप ॥२॥ परशुराम कृतांत काळ । अयोध्यावासी नृप गोवळ ॥३॥ निळा म्हणे बौध्य कलंकी । होउनी वेगळा नाटकी ॥४॥