भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग सांगे गडियां सुजाणां । जातां कावडीं हिरोनि आणा । काय करितो देवराणा । पाहों चरित्र देवांचे

mag sange gadiyan sujanan | jatan kavadin hironi ana | kay karito devarana | pahon charitra devanche

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग सांगे गडियां सुजाणां । जातां कावडीं हिरोनि आणा । काय करितो देवराणा । पाहों चरित्र देवांचे ॥१॥ सें सांगोनियां गडियांसी । प्रात:काळींचि हषिकेशी । जाऊनियां मार्गप्रदेशीं । रोखूनियां बैसला ॥२॥ तंव ते लोक सकळही । स्नानें करुनियां लवलाहीं । वस्त्रें अळंकार घालुनी देहीं । वादयें वाजवित सुस्वरें ॥३॥ करुनि सकळिकां आरोळी । चला चला म्हणती उतावेळीं । मग मिरवित कावडी कल्लोळीं । नाचविताचि चालिले ॥४॥ वाणी पढती इंद्रप्रतापें । ठांई ठांई नाचती पडपें । सोहळा देखोनियां तो गोप । म्हणती कृष्णा अवलोकीं ॥५॥ कैसा करीतुची हे गजर । आले अवघे नारीनर । तंव कृष्ण म्हणे रे निर्भर । होऊनि लुटा कावडी ॥६॥ निळा म्हणे ऐकोनि ऐसें । गोपाळ चौताळले आवेशें । म्हणती आणारे कृष्ण परे ईशें । कवडी इकडोचि आणविल्या ॥७॥