भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग बोले मंजुळा उत्तरी । मज न्या जी गोकुळाभितरी । ठेवुनी नंदयशोदेच्या घरी । तुम्हीं यावे तेच क्षणी

mag bole manjula uttari | maj nya ji gokulabhitari | thevuni nandayashodechya ghari | tumhin yave tech kshani

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग बोले मंजुळा उत्तरी । मज न्या जी गोकुळाभितरी । ठेवुनी नंदयशोदेच्या घरी । तुम्हीं यावे तेच क्षणी ॥१॥ ऐकोनी तयाचे उत्तर । वसुदेव विस्मित आणि चिंतातूर । म्हणे कैसा करावा विचार । बंधने गोविलें मजलागी ॥२॥ ऐशिया मोहें त्या कवळित । तंव तुटली बंधने झाला मुक्त । म्हणे आतां हा कृष्णनाथ । नेईन गोकुळांत ठेवीन ॥३॥ मग घेऊनियां निज बोधेशीं । आला वासुदेव गोकुळाशीं । देऊनिया त्या नंदापाशीं । म्हणे हें स्वीकारा बाळक ॥४॥ जन्मलें देवकीचिये उदरीं । परि हे ठेवितां नये घरीं । अहं कंसाचे भय भारी । यालागी तुम्हां हें कृष्णापर्ण ॥५॥ ऐशिया उत्तरी बोलिला । बाळक त्यापाशी दिधला । उघडोनि नंदे जो पाहिला । तंव तो देखिला चतुभुर्ज ॥६॥ निळा म्हणे वोळलें भाग्य । घरां आले पुसत चांग । उध्दरावया सात्विक जग । केला वास तया घरी ॥७॥