भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग हळूचि बोले अमृतवाणी । मागा म्हणोनी निजभक्तां

mag haluchi bole amrutavani | maga mhanoni nijabhaktan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग हळूचि बोले अमृतवाणी । मागा म्हणोनी निजभक्तां ॥१॥ मुक्त होईन सेवाऋणा । घ्या हो वरदाना इच्छेच्या ॥२॥ तुम्हांसी जें जें वाटे गोड । मागा कोड पुरतें ॥३॥ निळा म्हणे भक्त त्या म्हणती । आम्हांसी प्रीति तुमचीच ॥४॥