भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग लाउनी शिंकियाच्या हारी । बैसल्या जागत आपुल्या घरीं । कवडाआड आणि माजघरीं । शिंकिया जवळी भोंवताल्या

mag launi shinkiyachya hari | baisalya jagat apulya gharin | kavadaad ani majagharin | shinkiya javali bhonvatalya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग लाउनी शिंकियाच्या हारी । बैसल्या जागत आपुल्या घरीं । कवडाआड आणि माजघरीं । शिंकिया जवळी भोंवताल्या ॥१॥ पाटीये तळीं झांकोनी दीप । बैसल्या दवडोनियां झोंप । तंव हा सच्चिदानंदस्वरुप । आला चोरिये त्याचि घरां ॥२॥ गडी ठेवूनियां बाहेरी । चाहुली मारुनियां संचार करी । तंव या शिंकियाचिया हारी । चाचपडतां सांपडल्या॥३॥ तेणें हरिखेला अंतरीं । म्हणे आतां साधली चोरी । बरा निवाड फावला वरी । निजल्या नारी नेणती ॥४॥ गोड चाखोनियां तें पाहे । हातोहातीं लांबवीत जाय । दूध लोणी वरील साय । दहीं साजुक विरजलें ॥५॥ आपण खाये गडियां चारी । गोड आहे म्हणे हरी कुचकुचिती हळूचि करीं । म्हणतीं बाहेरी निघावें ॥६॥ तंव सांचल ऐकोनियां गौळणी । आवेशें धांविल्या अवघ्याजणी । दीप उघडिला तंव हा नयनीं । देखियला चोरिये भक्षितां ॥७॥ झडा घालुनियां वरी ॥ कवळिल्या अवघ्या नारीं । म्हणती कैसी करुनी चोरी । घरे आमुची बुडविली ॥८॥ निळा म्हणे बोलोनि ऐसें । चरणी बांधति आवेशे । तया किंव दावितसे । म्हणे मी आलों भुलोनिया ॥९॥