भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाईन कीर्तनीं गुण नाम पवाडे । तुमचे तुम्हां पुढे आवडीनें

gain kirtanin gun nam pavade | tumache tumhan pudhe avadinen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गाईन कीर्तनीं गुण नाम पवाडे । तुमचे तुम्हां पुढे आवडीनें ॥१॥ भावा ऐसे माझया व्हा जी पांडुरंगा । मग मी आलें भागा करीन तें ॥२॥ नाचेन सन्मुख चराणावरी दृष्टी । धरुनि प्रेम पोटीं आळवीन ॥३॥ निळा म्हणे तुम्हीं चरित्रे अपार । केलीं ते प्रकार आठविन ॥४॥