भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुण वर्णितां भागला शेष । महिमा विशेष नाकळे तो

gun varnitan bhagala shesh | mahima vishesh nakale to

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गुण वर्णितां भागला शेष । महिमा विशेष नाकळे तो ॥१॥ वेदहि ठकोनि ठेले मौन । पार नेणोन स्वरुपाचा ॥२॥ पुराणेंही कुंठित झालीं । अपार खोलीं नेणवे ते ॥३॥ निळा म्हणे तोचि हा येथें । आणिला समथें पुंडलिकें ॥४॥