भजनी मालिका
← भजनांकडे परत

गेला फिरोनिया दिवस । न ये घटिका लव निमिष

gela phironiya divas | na ye ghatika lav nimish

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गेला फिरोनिया दिवस । न ये घटिका लव निमिष ॥१॥ आहे तोंचि भरा हातीं । महा लाभाची संपत्ती ॥२॥ मागें नागवली फारें । गेलीं वांयां नारीनरें ॥३॥ निळा म्हणे म्हणोनि जागा । सांडोनी वोरबार वाउगा ॥४॥