भजनी मालिका
← भजनांकडे परत

गर्जतां विठोबाच्या नामें । जाळिलीं कर्मे शुभाशुभें

garjatan vithobachya namen | jalilin karme shubhashubhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गर्जतां विठोबाच्या नामें । जाळिलीं कर्मे शुभाशुभें ॥१॥ रिघाले अवघियां बाहेरी । विठ्ठल अंतरीं धरुनियां ॥२॥ कैंचें तयां मायाजाळ । विराली तळमळ कल्पनेची ॥३॥ निळा म्हणे भोग त्याग । त्यांचें पांडुरंग हो सरला ॥४॥