भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोड माझी वाणी तुम्हीं करुनि श्रीहरी । लावावी वैखरी कीर्तनस्तवनीं आपुलिये

god majhi vani tumhin karuni shrihari | lavavi vaikhari kirtanastavanin apuliye

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गोड माझी वाणी तुम्हीं करुनि श्रीहरी । लावावी वैखरी कीर्तनस्तवनीं आपुलिये ॥१॥ इतुलेंनिचि सार्थक माझया होईल जन्माचें । अभयदान तुमचें ऐसें झालियावरी ॥२॥ बहुत दिवस आस्था मनीं वाहिली हेचि । करावी तुमची सेवा-स्तुति निजभावें ॥३॥ निळा म्हणे चरणावरीं ठेविली डोई । अपराध ते माझे कांहीं मना नाणावें ॥४॥