भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

व्यर्थ कां हव्यासीं करिसी परोपरी । नाम निरंतरीं न म्हणा कां रे ॥१॥ आयुष्य जाईल क्षणांत सरोन । पावसी पतन कुंभिपाकीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

व्यर्थ या व्युत्पत्ति लवितोसी श्रुति । विषयांची तृप्ति काय चाड ॥१॥ मायेचा हा फांसा मोहजाळ सोसा । वांयां कासा-विसा होसी झणीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

व्यापकं तें नाम तेव्हांच होईल । जेव्हां ओळखेल मीपणासी ॥१॥ आपुलेंचि नाम न ओळखिलें । व्यापक साधिलें जायेचिना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

व्यापकारीस मन केलें वाड । सांपडलें गोड प्रेममुख ॥१॥ जिकडे पाहें तिकडे विठ्ठल अवघा । भीमा चंद्रभागा पुंडलिक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

व्रत तप दान हवन पूजन । न लगे साधन नाम म्हणतां ॥१॥ रामकृष्ण हरी मुकुंड मुरारी । जिव्हे क्षणभरी न विसंबें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

व्रत तप न लगे करणें सर्वथा । न लगे तुह्मां तीर्था जाणे तया ॥१॥ आपुलेचि ठायीं असा सावधान । करा हरि-कीर्तन सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

व्रतबंधदीक्षा उपद्श गायत्री । ॐकार मूळमंत्री स्वर सोळा ॥१॥ केलें वेदपठण काव्य आणि व्याकरण । जालासे निपुण शास्त्रवक्ता ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शब्दाचें ब्रम्हा लौकिकी हो दिसे । जैसे ते फांसे मइंदांचे ॥१॥ ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण । दोहींचा आपण साक्षभूत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शब्दाचें सुख श्रवणाचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें ॥१॥ स्पर्शाचें सुख त्वचेचेनि द्वारे । माझिया दातारें ऐसें केलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शब्दामृत मांडे येती भोजना । अभ्यासी अज्ञाना तरी फळें ॥१॥ मुंगीचे थडके फुटे जों आकाश । ब्रह्मत्वेम सायास नये हातीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शरणागता तारी भवसिंधु त्वरीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥१॥ अरण्यांत दुष्ट दैत्यांसी मारीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शरणागतासी नको मोकलावा । हें तरी केशवा जाणतोसी ॥१॥ सांगणें नलगे सांगणें नलगे । सांगणें नलगे मायबाप ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शरीर काळाचें भातुकें । तुह्मीं नेणां कां इतुकें ॥१॥ माझा जन्म गेला वांयां । तुजविण पंढरिराया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शरीर हें जायाचें नश्वर आणिकांचें । म्हणाल जरी त्याचें काय काज ॥१॥ आंबरसें चोखिला बिजसालें सांडिला । पुढें तेणें उभविला दुजा एकू ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शरीराचा भाव तुज नाहीं देवा । तेथें मी केशवा काय बोलूं ॥१॥ अंगदाचे अंगीं बळ देसी फार । बहु उपकार कळों आलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शांति भीमातीरीं भक्ति पंढरपुरीं । प्रेम विटेवरी देखि-यलें ॥१॥ देखिलागे माय देखिलागे माय । देखिलागे मय पंधरीये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शाममूर्ति डोळस सुंदर सांवळी । तें ध्यान ह्लदय- कमळीं धरूनि ठेला ॥१॥ सकळ स्थिति सुखाचा अनुभव झाला । सकळ विसरला देहभाव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव