भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्रतबंधदीक्षा उपद्श गायत्री । ॐकार मूळमंत्री स्वर सोळा

vratabandhadiksha upadsha gayatri | omkar mulamantri svar sola

रचनाकार: संत नामदेव · अभंग
व्रतबंधदीक्षा उपद्श गायत्री । ॐकार मूळमंत्री स्वर सोळा ॥१॥ केलें वेदपठण काव्य आणि व्याकरण । जालासे निपुण शास्त्रवक्ता ॥२॥ मग पुष्करादि तीर्थें पाहावीं समस्तें । अनुताप चित्तें धरियेला ॥३॥ वैराग्यपुतळा ज्ञानगम्य मूर्ति । निघालासे भक्ति तीर्थाटणा ॥४॥ विठठलें वंदुनी मातापिता दोन्ही । मग तीर्थाटणीं मुहूर्त केला ॥५॥