विठ्ठलाचा छंद । वाचे गोविंद गोविंद
viththalacha chhand | vache govind govind
विठ्ठलाचा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥१॥ हाचि बोला हो सिद्धांत । देव सांगे हो धादांत ॥२॥
विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.
viththalacha chhand | vache govind govind
विठ्ठलाचा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥१॥ हाचि बोला हो सिद्धांत । देव सांगे हो धादांत ॥२॥
viththalache pay dharuniyan rahen | mag sansar to kay karil tujhen
विठ्ठलाचे पाय धरूनियां राहें । मग संसार तो काय करील तुझें ॥१॥ संसाराचें भय नाहीम हरिचे दासा । विठु आह्मां सरिसा निरंतर ॥२॥
viththalenvin jaya na game ek ghadi | sarvasva avadi viththalachi
विठ्ठलेंविण जया न गमे एक घडी । सर्वस्व आवडी विठ्ठालाची ॥१॥ विठ्ठालचि माता विठ्ठालचि पिता । भगिनी आणि भ्राता विठ्ठालचि ॥२॥
viththal visanva sakalikan | viththal adhar tihi lokan | viththal nakale brahmandikan | viththal rekha pandhariye
विठ्ठाल विसांवा सकळिकां । विठ्ठाल आधार तिही लोकां । विठ्ठाल नकळे ब्रह्मांदिकां । विठ्ठाल रेखा पंढरीये ॥१॥ विठ्ठाल डोळस सांवळा । विठ्ठाल धरारे मानसीं । विठ्ठाल सोडवील अहर्निशीं । विठ्ठालावीण मुक्ति कैंची । कुंटणी गणिकेसी उद्धरिलें ॥३॥
vidhi ved viruddha samparka sambandh | nahin bhedabhed svasvarupin
विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध । नाहीं भेदाभेद स्वस्वरुपीं ॥१॥ अविधि आचरण परम दूषण । वेदोनारायण बोलियेला ॥२॥
vinanti kari mandodari | parisa svami dashakandhari
विनंति करी मंदोदरी । परिसा स्वामी दशकंधरि ॥१॥ वांयां आणिली जानकी घरीं । लाज झाली तिहीं लोकीं ॥२॥
vinaviti sant anik sajjan | navhe samadhan kanhin kelya
विनविति संत आणिक सज्जन । नव्हे समाधान कांहीं केल्या ॥१॥ नानाचि प्रकार करितसे घोर । कांहीं केल्या स्थिर चित्त नव्हे ॥२॥
vipra vesh tevhan gheuni nighala | gokulasi ala lagavegen
विप्र वेष तेव्हां घेऊनि निघाला । गोकुळासी आला लागवेगें ॥१॥ पुत्रोत्सव कोठें लोकांला पुसत । भावीत सांगत नंदाघरीं ॥२॥
vimananchi dati antarikshin dev | karitati sarva garbha-stuti
विमानांची दाटी अंतरिक्षीं देव । करिताती सर्व गर्भ-स्तुती ॥१॥ सत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ति । यज्ञेशा तुजप्रती नमो नमो ॥२॥
vimanin baisali viththal sukhamurti | ghetala nivrutti madhyabhagin
विमानीं बैसली विठ्ठल सुखमूर्ती । घेतला निवृत्ति मध्यभागीं ॥१॥ राही रखुमाई बैसले सुरगण । उठलीं विमानें गंधर्वांचीं ॥२॥
viranchicha bap kshirasagaravasi | dhyati yogi tyasi nirantar
विरंचीचा बाप क्षीरसागरवासी । ध्याती योगी त्यासी निरंतर ॥१॥ परेहूनिपर वैखरीहूनि दुरी । कौसल्येचे उदरीं तोचि असे ॥२॥
vivekachi penth | ughadi pandharichi vat
विवेकाची पेंठ । उघडी पंढरीची वाट ॥१॥ तेथें नाहीं कांहीं धोका । उठाउठी भेटे सखा ॥२॥
vishayasangen savin jage | harikirtanin jhomp lage
विशयासंगें सवीं जागे । हरिकीर्तनीं झोंप लागे ॥१॥ काय करूं या मनासी । नाठवेचि ह्लषिकेशी ॥२॥
vishvajanamohana kapatiya narayana | kay devapana miravitosi
विश्वजनमोहना कपटिया नारायणा । काय देवपणा मिरवितोसी ॥१॥ दर्शना आलिया हृदयीं संचरसी । देहभावा घेसी हिरोनियां ॥२॥
vishvambhar nam tujhen kamalapati | jagin shruti smruti vakhaniti
विश्वंभर नाम तुझें कमळापती । जगीं श्रुति स्मृति वाखाणिती ॥१॥ गौळियां घरींचें दहीं लोणी चोरूनी । खातां चक्रपाणि लाजसी ना ॥२॥
vishvacha jo bap hatin jyachya sutra | hmanavito putra nandajicha
विश्वाचा जो बाप हातीं ज्याच्या सूत्र । ह्मणवितो पुत्र नंदजीचा ॥१॥ तीर्थें ज्याच्या चरणीं करीतातीं न्हाणीं । य-शोदा जननी म्हणताती ॥२॥
vishvachya mohana kapat nataka | pandharinayaka pandu-ranga
विश्वाच्या मोहना कपट नाटका । पंढरीनायका पांडु-रंगा ॥१॥ अवतार धरूनि होऊनि निमित्त । बुजविसी दैत्य सर्प खाणी ॥२॥
vish pajavaya putana te ali | te tuvan tarili kay mhanuni
विष पाजावया पूतना ते आली । ते तुवां तारिली काय म्हणुनि ॥१॥ पुसा या म्हणोनि वेश्या बोभाईलि । ती तुवां तारिली काय म्हणूनि ॥२॥
vishay tadatodi kari majhe man | rahilen mhanon tujhe pain
विषय तडातोडी करि माझे मन । राहिलें म्हणोन तुझे पाइं ॥१॥ नको नको देवा वासनेचा संग । मज आला दुभंग नारायणा ॥२॥
vishay sevitan tuj | navhe pudhil kaj | kada na bhete tuj | garudadhvaj nishchayensi
विषय सेवितां तुज । नव्हे पुढील काज । कदा न भेटे तुज । गरुडध्वज निश्चयेंसी ॥१॥ काय करिसी खटपत । वांयां मार्ग दुर्घट । वरपडा होसील कष्ट । परि संसार न सुटेचि ॥२॥