भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरणागतासी नको मोकलावा । हें तरी केशवा जाणतोसी

sharanagatasi nako mokalava | hen tari keshava janatosi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शरणागतासी नको मोकलावा । हें तरी केशवा जाणतोसी ॥१॥ सांगणें नलगे सांगणें नलगे । सांगणें नलगे मायबाप ॥२॥ सांगतां समर्थ सवेंचि विसरे । त्याच्या अभ्यंतरीं नव्हे बोल ॥३॥ नामा म्हणे तैसा न होसी शहाणा । अठराहि पुराणें वेडावलीं ॥४॥