भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

शेंदूर पारवे नीळवर्ण ठसे । जनीं वनीं दिसे परब्रह्म ॥१॥ मुक्ताफळ भरित सबाह्य कोंदलें । रूप हें चांगलें विठोबाचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शेवटची समाधि जाली जैसी तैसी । तुज ह्रषिकेशी समर्पिली ॥१॥ आपुल्या सत्ताबळें चालविलें हरि । विष्णुदासावरी कृपा केली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शेवटिली पाळी तेव्हां मनुष्य जन्म । चुकलीया वर्म फेरा पडे ॥१॥ एक जन्मीं ओळखी करा आत्मारामा । संसार सुगम भोगूं नका ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शेषयायी हरी उठोनि लवकरी । ह्मने सख्या धरीं मनुष्यरूप ॥१॥ तुजविण मज न गमे घटिका । म्हणोनि नेटका रूप धरीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊं आतां ॥१॥ पृथ्वीवरी दैत्य माजले ते फार । गार्‍हाणें सुरवर सांगूं आले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रवणमात्रें जळती पापाचे पर्वत । ऐकें ब्रह्मगीत शूक ह्मणे ॥१॥ धरूनि विश्वास करी जो पठण । तरेल तो जाण भवसिंधूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रवणीं सांगितली मात मस्तकीं ठेवियेला हात । पदपिंडाविवर्जित केला नामा ॥१॥ खेचरु विसा प्रेमाचा पिसा । तेणें नामा कैसा उपदेशिला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीकृष्ण जन्मला वार्ता ही ऐकोनी । चिंता कंसा मनीं प्रवर्तली ॥१॥ उद्विग्न मानसीं कंस तो बैसला । सन्मुख देखिला महाबळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीकृष्ण लीलामृत बाणतांचि गोडी । कथेचि परवडी आवडती ॥१॥ तयाचा विस्तार तोचि बोलवीता । आहे सर्व सत्ता त्याचे हातीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीधरा अनंता गोविंदा केशवा । मुकुंदा माधवा नारा -यणा ॥१॥ देवकी तनया गोपिकारमणा । भक्त उद्धारणा केशिराजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीपाद म्हणती याच्या दोषास्तव । माझें पुण्य सर्व लया जातें ॥१॥ सिदोपंत म्हणत तुम्ही दयावंत । सीघ्र गमनार्थ कीजे स्वामी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीमुख साजिरें कुंडलें गोमटीं । तेथें माझी दृष्टी बैसलीसे ॥१॥ कटावरी कर समचरन साजिरे । देखावया झुरे माझें मन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीमुख सुंदर वाटोळें । कैसें नीलोत्पल सांवळें ॥१॥ पैं सेंडी गडी धाकुटा । होय घोंगडें खांदा मोठा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीमूर्ति असे बिंबली । तरी हे देहस्थिति पालटली ॥१॥ धन्य माझा इह जन्म । ह्रदयीं विठोबाचें नाम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीराम सोयरा आला माझ्या घरा । दिधला म्यां थारा ह्लदयीं माझा ॥१॥ पावलों विश्रांति धालें माझें मन । न लगे आतां ध्यान शिकावया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीविठ्ठलें आपुल्या मुखवचनें । नामदेवासी करी अज्ञापन । होवोनि दीनाचें अति दीन । सद्‌गुरूसी शरन रिघावें ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीहरि श्रीहरि ऐसें वाचे म्हणेन । वाचा धरिसी तरी श्रवणें ऐकेन ॥१॥ श्रावणीं दाटसी तरी मी नयनीं पाहिन । ध्यानीं मी ध्याईन जेथें तेथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रोते ह्मणती विष्णुदासा । या ब्रह्मांडींचा प्रळय कैसा । पंढरीच्या भास । नाश कीं नाहीं ॥१॥ तंव नामा ह्मणे सुदर्शना-वरी । देवें रचिली पंढरी । भक्तांसहित राज्य करी । रुक्मिणीवर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव