भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

जयां नामाचा विश्वास । धन्य तेंचि हरिचे दास । वंदीन पायंस । वारंवार तयांच्या ॥१॥ कुळ तारिलें सकळ । वाचे नामावळी अढळ । गाती रामनाम सरळ । नोहे क्षण आराणूक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जया संतचरणी नाहीं विश्वास । धिक त्यास वास यमपुरी ॥१॥ संतचरणीं मन ठेवा रे निश्चळ । करुना उतावेळ भाका त्यासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाकारणें श्रमलें भांडती । वेदादिकां न कळे मती । वोळला सगुण मूर्ती । पुंडलिकाकारणें ॥१॥ धन्य धन्य पावन देखे । पुण्यभूमि पावन सुरेख । तया गातां होतसे हर्ष । प्रेमानंदे डुल्लती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाचिया अंगीं सकळ त्या कळा । तो परब्रह्मा पुतळा पंढरीये ॥१॥ वेदांती सिद्धांती थकले धादांती । परी एकाचीही मती चालेचिना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाचिया भेटी जातां । मोक्ष सायुज्यता पाठीं लागें ॥१॥ ऐसा उदार पंढरीराणा । पुरवी खुणा मनींच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाचियें द्वारी तुळशीवृंदावन । धन्य तें सदन वैष्णावांचे ॥१॥ उत्तम चांडाळ अथवा सुशीळ । पावन सकळ वैकुंठी होती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाचीं ती अनंत नामें । अनंत अवतार अनंत जन्में ॥१॥ अगाध श्रीहरीचा महिमा । त्याचा पार नेणें ब्रह्मा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाची समदृष्टी पाहुं धावे मन । शोभते चरण विटेवरी ॥१॥ कानडें कानडें वेदांसी कानडें । श्रुतीसी जो नातुडें गीतीं गातां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयांचे उदारपण काय वानुं । उपमेसी नये कल्पतरु कामधेनु । वेधीं विधियेलें आमुचें मनु । तो हा देखिला सावळा श्रीकृष्ण ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

जयांचें चित्त संताच्या चरणा । तेणें नारायणा जिंकियलें ॥१॥ भावें देव मिळे भावें देव मिळे । संतचरणीं लोळे सर्व काळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाचेचि चरणीं तीर्था तीर्थपण । तों हृदयीं केला सांठवण ॥१॥ नवल महिमा हरिदासाची । तीर्थें उपजती त्याचे कुशीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाच्या चरणां मिठी घाली भावें । धन्य ते जाणावे सदैव संत ॥१॥ प्रेमाचे सागर भक्तीचे उदधी । तोडिला उपाधी नाममात्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाच्या दरुशनें शिवादिकां तृप्ती । योगी हृदयीं जया ध्याती । सहा चारा अठरा जया वर्णिता । सहस्त्रमुखा न कळे जायाची गती ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ