भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाचेचि चरणीं तीर्था तीर्थपण । तों हृदयीं केला सांठवण

jayachechi charanin tirtha tirthapan | ton hrudayin kela santhavan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयाचेचि चरणीं तीर्था तीर्थपण । तों हृदयीं केला सांठवण ॥१॥ नवल महिमा हरिदासाची । तीर्थें उपजती त्याचे कुशीं ॥२॥ काशीं मरणें होय मुक्ति । तेथें वचनें न मरतां होय मुक्ति ॥३॥ एका जनार्दनाचे भेटी । सकळ तीर्थे वोळंगतीं दिठी ॥४॥