भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयां नामाचा विश्वास । धन्य तेंचि हरिचे दास । वंदीन पायंस । वारंवार तयांच्या

jayan namacha vishvas | dhanya tenchi hariche das | vandin payans | varanvar tayanchya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयां नामाचा विश्वास । धन्य तेंचि हरिचे दास । वंदीन पायंस । वारंवार तयांच्या ॥१॥ कुळ तारिलें सकळ । वाचे नामावळी अढळ । गाती रामनाम सरळ । नोहे क्षण आराणूक ॥२॥ ते भाग्याचे नरीनर । ज्यांचा ऐसा निर्धार । एका जनार्दनीं साचार । दृढ भाव रामनामीं ॥३॥