भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयांचे उदारपण काय वानुं । उपमेसी नये कल्पतरु कामधेनु

jayanche udarapan kay vanun | upamesi naye kalpataru kamadhenu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयांचे उदारपण काय वानुं । उपमेसी नये कल्पतरु कामधेनु । वेधीं विधियेलें आमुचें मनु । तो हा देखिला सावळा श्रीकृष्ण ॥१॥ मंजुळ मंजुळ वाजवी वेणु । श्रुतीशास्त्रा न कळें अनुमानु । जो हा परापश्यंती वेगळा वामनु । तया गोवळा म्हणती कान्हू ॥२॥ रुप अरुपाशीं नाहीं ठाव । आगमीनिगमां न कळे वैभव । वेदशास्त्रांची निमाली हांव । एका जनार्दनीं देखिला स्वयमेव ॥३॥