भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाचें देखतां चरण । तुटेल जन्म जरा मरण

jayachen dekhatan charan | tutel janma jara maran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयाचें देखतां चरण । तुटेल जन्म जरा मरण ॥१॥ तो हा चंद्रभागेच्या तीरी । कट धरुनिया करीं ॥२॥ नाम घेतां आवडी । तुटेल संसाराची बेडी ॥३॥ भाविकांसी पावे । मागें मागें त्यांच्या धांवे ॥४॥ म्हणे जनार्दनाचा एका । आवडीने नाम घोका ॥५॥