भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयांचें चित्त संताच्या चरणा । तेणें नारायणा जिंकियलें

jayanchen chitta santachya charana | tenen narayana jinkiyalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयांचें चित्त संताच्या चरणा । तेणें नारायणा जिंकियलें ॥१॥ भावें देव मिळे भावें देव मिळे । संतचरणीं लोळे सर्व काळ ॥२॥ संतांची आवडी म्हणोनि अवतार धरी । योगक्षेम भारी चालवी त्यांचा ॥३॥ संतचरणी सेवा आदर उपचार । एका जनार्दनीं साचार करीतसे ॥४॥