भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयांचें पाहतां श्रीमुख । हरे कोटी जन्म दुःख

jayanchen pahatan shrimukh | hare koti janma duhkh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयांचें पाहतां श्रीमुख । हरे कोटी जन्म दुःख ॥१॥ तो हा उभा विटेवरी । भक्तकाज म्हणवी कैवरी ॥२॥ वेदासी जो दुर्गम । आम्हां कळलें तयांचें वर्म ॥३॥ ऐसा भक्तवत्सल तो एक दीनानाथ । एका जनार्दनीं तया ध्यान ॥४॥