भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाची समदृष्टी पाहुं धावे मन । शोभते चरण विटेवरी

jayachi samadrushti pahun dhave man | shobhate charan vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयाची समदृष्टी पाहुं धावे मन । शोभते चरण विटेवरी ॥१॥ कानडें कानडें वेदांसी कानडें । श्रुतीसी जो नातुडें गीतीं गातां ॥२॥ परात्पर साजिरें बाळरुप गोजिरें । भाग्यांचे साजिरे नरनारी ॥३॥ एका जनार्दनी कैवल्य जिव्हाळा । मदनाची पुतळा विटेवरी ॥४॥