भजनी मालिका

भजने

हरिनामीं उदास तो पतित निष्ठुर । तया यमकिंकर गांजितील ॥१॥ तोचि हरिचा दासु नामीं । ज्या विश्वासु । तया गर्भवासु नाहीं नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिपाठ गजरें केला जयजयकार । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥ टाळ मृदंग वाजती अपार । मिरविती भार वैष्णवांचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिभक्त माझे जिवलग सांगाती । सांभाळूनी नेती परलोका ॥१॥ वचनेंचि त्यांच्या होय महा लाभ । करी पदमनाभ कृपादृष्टी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हरिभक्त म्हणविणें हरिदर्शना नाहीं जाणें । बोलतां लजिरवाणें अहोजी देवा ॥१॥ पतिव्रता म्हणविणें आणि परपुरुषीं विचारणें । बोलतां लजिरवानें अहोजी देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिभक्ति आथिले तेचि उत्तम । येर ते अधम अध-मांहुनी ॥१॥ हरिभक्तीं सप्रेम तेंचि तैसें नाम । येर ते अधम अना-मिक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिभक्तीचा उभारिला ध्वज । परमार्थाचें बीज न क-ळेची ॥१॥ काय करूं देवा जळो त्याची बुद्धी । जया नाहीं शुद्धि परलोकींची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिभक्तीच्या जाणोनी नीति । त्याचि उपदेशिती भाविकां ॥१॥ पडो नेदिती अडचणी गोवा । जातां देवा भेटिसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हरिरुप ध्यानीं हरिनाम वदनीं । हरीच्या चिंतनीं तद्रूपता ॥१॥ हरि तयां अंतरी हरि तयां बाहेरी । रक्षी निरंतर श्रीहरी त्यां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हरिवांचुनी ठाव रिता कोठें आहे । विचारुनी पाहें मनामाजीं ॥१॥ सर्व तो व्यापक भरुनि उरला । वाउगाचि चाळा वाहुं नको ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरिविण देह मळीण सर्वथा । मंगळाची कथा रामकृष्ण ॥१॥ कथा करी कोणी ऐकती जे जन । वैकुंठभुवन हातां आलेम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव