भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिभक्त माझे जिवलग सांगाती । सांभाळूनी नेती परलोका

haribhakta majhe jivalag sangati | sambhaluni neti paraloka

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हरिभक्त माझे जिवलग सांगाती । सांभाळूनी नेती परलोका ॥१॥ वचनेंचि त्यांच्या होय महा लाभ । करी पदमनाभ कृपादृष्टी ॥२॥ मोहादिबंधनें जाती तुटोनियां । कळिकाळहि पायांतळीं दडे ॥३॥ निळा म्हणे मुक्त मोकळिया वाटा । जावया वैकुंठा त्यांच्या संगें ॥४॥