भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिनामीं ज्याची प्रीती । सदा वानिती हरिनाम

harinamin jyachi priti | sada vaniti harinam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरिनामीं ज्याची प्रीती । सदा वानिती हरिनाम ॥१॥ धन्य धन्य जन्म त्याचा । उच्चार वाचा हरिनाम ॥२॥ नेणती शीण योग यागीं । घेती जगीं हरिनाम ॥३॥ एका जनार्दनीं हरिनाम । उमेशी सांगे राम जप करी ॥४॥