हरीचें पाहतां श्रीमुख । सुखावलें मन नित्य नवा हर्ष
harichen pahatan shrimukh | sukhavalen man nitya nava harsha
हरीचें पाहतां श्रीमुख । सुखावलें मन नित्य नवा हर्ष ॥१॥ परमाप्रिय वो श्रीहरी । ध्याता ध्यान ध्येय सर्व हरि ॥२॥
harichen pahatan shrimukh | sukhavalen man nitya nava harsha
हरीचें पाहतां श्रीमुख । सुखावलें मन नित्य नवा हर्ष ॥१॥ परमाप्रिय वो श्रीहरी । ध्याता ध्यान ध्येय सर्व हरि ॥२॥
harichen manohar kirtan | henchi sadhan kaliyugin
हरीचें मनोहर कीर्तन । हेंचि साधन कलियुगीं ॥१॥ नको आणिकां मतांतरी । पडो भवसागरीं वहावसी ॥२॥
harichya jagarana | jatan kan re naye mana
हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥१॥ कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाठी ॥२॥
harichya dasan bhaye | aisen bolon ten hi naye
हरीच्या दासां भये । ऐसें बोलों तें ही नये ॥१॥ राहोनियां आड । उभा देव पुरवी कोड ॥ध्रु.॥
harichya dasan sopen varma | sarva dharma paulen
हरीच्या दासां सोपें वर्म । सर्व धर्म पाउलें ॥१॥ कडिये देव बाहेर खांदी । वैष्णव मांदी क्रीडेसी ॥ध्रु.॥
harichya namen hariche das jale sakalikans vanday jagin
हरीच्या नामें हरीचे दास जाले सकळिकांस वंदय जगीं ॥१॥ समोर त्याच्या नये काळ । कळिचा अमंगल म्हणउनी ॥२॥
harichya padhoniyan namavali | kariti holi mahadosha
हरीच्या पढोनियां नामावळी । करिती होळी महादोषा ॥१॥ तेचि धन्य देहधारी । या माझारीं कलियुगा ॥२॥
harichya payin vishvasalen | savangade jhale mhanauni
हरीच्या पायीं विश्वासलें । सवंगडे झाले म्हणउनी ॥१॥ दिवस रातीं नव्हतां तुटी । सांगती गोठी आलोकिका ॥२॥
harichya bhajanen hariche bhakta hariche bhakta | jhale vikhyat bhumandalin
हरीच्या भजनें हरीचे भक्त हरीचे भक्त । झाले विख्यात भूमंडळीं ॥१॥ तरोनि आपण तारिले आणिका । वैकुंठनायका प्रिय झाले ॥२॥
harijana pran vikali he kaya | ankila mi taya gharin jhalon
हरीजना प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरीं झालों ॥१॥ म्हणियें सत्वर करीन सांगतां । घेईन मी देतां शेष त्यांचें ॥ध्रु.॥
harijanachi konan na ghadavi ninda | sahat govinda nahin tyachen
हरीजनाची कोणां न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥१॥ रूपा येऊनियां धरी अवतार । भक्तं अभयंकर खळां कष्ट ॥ध्रु.॥
haridasachiye gharin | maj upajava janmantarin
हरीदासाचिये घरीं । मज उपजवा जन्मांतरीं ॥१॥ म्हणसी कांहीं मागा । हें चि देगा पांडुरंगा ॥ध्रु.॥
harinam gatan pavitra | seviti harihar brahmadik
हरीनाम गातां पवित्र । सेविती हरिहर ब्रह्मादिक ॥१॥ नाम तारी नाम साहाकारी । नामें उच्चारी रुपें तुझीं ॥२॥
harinam veli pavali vistar | phalin pushpin bhar volhavali
हरीनाम वेली पावली विस्तार । फळीं पुष्पीं भार वोल्हावली ॥१॥ तेथें माझ्या मना होई पक्षिराज । साधावया काज तृप्तीचें या ॥ध्रु. ॥
harinamachen karuni tarun | bhavasindhupar utaralon
हरीनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों ॥१॥ फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु.॥
harinamamrut tarale apar | vyas valmikadi nirdhar taralen jan
हरीनामामृत तरले अपार । व्यास वाल्मिकादि निर्धार तरलें जाण ॥१॥ सेवेचिनि मिसें अक्रूर तरला । उद्धोध जाहला हृदयामाजीं ॥२॥
harinen majhen harilen chitta | bhar vitta visaralen
हरीनें माझें हरीलें चित्त । भार वित्त विसरलें ॥१॥ आतां कैसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥ध्रु.॥
haribin rahiyan na jaye jihira | kabaki thadi dekhen raha
हरीबिन रहियां न जाये जिहिरा । कबकी थाडी देखें राहा ॥१॥ क्या मेरे लाल कवन चुकी भई । क्या मोहिपासिती बेर लगाई ॥ध्रु.॥
haribhakti majhe jivalag soire | hrudayin paule dharin tyanche
हरीभक्ती माझे जिवलग सोइरे । हृदयीं पाउले धरिन त्यांचे ॥१॥ अंतकाळीं येती माझ्या सोडवणे । मस्तक बैसणें देइन त्यांसी ॥ध्रु.॥
harirata chapala nari | lagavari na righati
हरीरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥१॥ अवघ्या अंगें सर्वोत्तम । भोगी काम भोगता ॥ध्रु.॥