भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिप्राप्तीसी उपाय । धरावें संतांचें ते पाय

haripraptisi upay | dharaven santanchen te pay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरिप्राप्तीसी उपाय । धरावें संतांचें ते पाय ॥१॥ तेणें साधती साधनें । तुटतीं भवांचीं बंधनें ॥२॥ संताविण प्राप्ति नाहीं । ऐशीं वेद देत ग्वाही ॥३॥ एका जनार्दनीं संत । पूर्ण करिती मनोरथ ॥४॥