भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिभक्त संत झाले हो अनेक

haribhakta sant jhale ho anek

हरिभक्त संत झाले हो अनेक । त्यामाजी निष्टंक कांही ऐक ॥१॥ शुक वामदेव शौनक नारद । अजामेळ प्रल्हाद बिभीषण ॥२॥ ध्रुव पराशर व्यास पुंडलिक । अर्जुन वाल्मिक अंबरीष ॥३॥ रुक्मांगद भीष्म बगदालभ्यसूत । सिभ्री हनुमंत परिक्षिती ॥४॥ कश्यपादि अत्री गौतम वशिष्ठ । भारव्दाज श्रेष्ठ मार्कंडेयो ॥५॥ बळी कृपाचार्य इंद्र सूर्य चंद्र । ब्रह्माआदि रुद्र पूर्ण भक्त ॥६॥ सर्वांचा एक आहे मी किंकर । म्हणे ज्ञानेश्वर वैष्णवांसी ॥७॥