भजनी मालिका

भजने

स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचें । काय त्या प्रेमाचें सुख मज ॥१॥ दुःखवीना चित्त तुझें नारायणा । कांहीं च मागेना तुजपासीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्वाहिताकारणें विचार न कळे । संध्येंचें हें मुळ आम्ही जाणों ॥१॥ अर्ध बिंबीं सूर्य धरूं माध्यान्हासी । अस्तु जातां त्यासी अर्घ्य देतो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हनुमंत गेला सीताशुद्धिलागीं । लंका मध्यभागीं ये-ऊनियां ॥१॥ माता जानकीच्या करीत शुद्धीसी । हिंडे गृहदेशीं राक्षसांच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हमामा घाली राम अवतारीं । कैकईची भीड तुला भारी । प्रस्थान ठेविलें लंकेवरी ॥१॥ हमामा तुं घाली । कान्होंबा हुतुतुतु खेळुं ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

हमामा भाई हुंबरी । खेळों भाई हमामा हुंबरी ॥१॥ राम रावण हमामा घालितीं । हनुमान बेळें खेळीया निज ज्योंती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हमामा भाई हुंबली । गोपाळ वासुरें कान्होबा जाला ना ब्रह्मामाया बोंबली रे ॥१॥ हमामा भाई बार कोंडे । वासुरें लेकुंरें कान्होबा जाला ठकविलें ब्राह्मण चहुं तोडें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हमामा माडिला कान्होबा भाई । हमामा खेळूं भाई कान्ह्बा तुझें पायीं ॥१॥ हमामा रे हमामा । कान्होबा खेळूं हमामा ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलें पोर । करी येरझार चौर्‍यांशीची ॥१॥ पहिले पहारा रंगासि आलें । सोहं सोहं सें बार घेतलें । देखोनि गडी तें विसरलें । डाई पडिलें आपणची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हमामा हुबरी खेळती एक मेळा । नानापरींचें गोपाळ मिळती सकळां ॥१॥ एक धावें पुढें दुजा धावे पाठीं । एक पळें एकापुढें एक सांडोनि आटी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हमामा हुंबरी घालुं नका एक भावें । जेथे वसे कान्होबा तें घर आम्हां ठावें ॥१॥ हमामा घालुं आवडीं । कान्होंबा तुं आमुचा गडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ