भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिपाठ कीर्ति मुखें जरी गाय

haripath kirti mukhen jari gay

हरिपाठ कीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥ तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमुप । चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥२॥ मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥२॥ ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिलें माझ्या हातीं ॥४॥