भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिभक्तीच्या जाणोनी नीति । त्याचि उपदेशिती भाविकां

haribhaktichya janoni niti | tyachi upadeshiti bhavikan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हरिभक्तीच्या जाणोनी नीति । त्याचि उपदेशिती भाविकां ॥१॥ पडो नेदिती अडचणी गोवा । जातां देवा भेटिसी ॥२॥ बैसवूनियां सुखासनीं । पावविती धमीं वैकुंठा ॥३॥ निळा म्हणे देऊनी संग । ठेविता अभंग हरिपदीं ॥४॥