भजनी मालिका

भजने

आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥१॥ आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपुले रूपीं मज लपवीं निरंतरीं । समाये भीतरीं आड राहे ॥१॥ परि तुज मज असावा संबादू । भ्रांति मायाबाधु करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आपुलें वेचूनि खोडा घाली पाव । ऐसे जया भाव हीनबुद्धी तो ॥१॥ विषयांच्या संगें आयुष्याचा नास । पडियेलें ओस स्वहितांचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझें जड करुन घ्याल ॥१॥ उद्धारासी काय उधाराचें काम । वाढवूं चि श्रम नये देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें । आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥ वायांचि करणें लौकिकाचा गोवा । कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आपुल्या आम्ही पुसिलें नाही । तुज कांहीं कारणें॥१॥ मागें मागें धांवत आलों । कांहीं बोलों यासाटीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपुल्या नामा आपण वाढवी । भक्तपणस्वयें मिरवीं । अवतार नाना दावीं । लाघव आपुलें ॥१॥ करी भक्तांचे पाळण । वाढवी त्यांचें महिमान । तयासी नेदी उणीव जाण । वागवी ब्रीद नामाचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आपुल्या नामाची आवडी । वैकुंठाहुनी घाली उडी । वारी भक्तांची सांकडीं । नामासाठीं आपुल्या ॥१॥ ऐसा नामाचा पोवाडा । नाम उच्चारा घडघडा । तेणीं निवारें यमपीडा । साचपणें भक्तांची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आपुल्या पित्यासी तिणें बोलाविलें । जाहलें तें कथिलें वर्तमान ॥१॥ पतीचा संकल्प नोहे अंगसंग । राहिला उद्योग प्रपंचाचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आपुल्या मनासीं करिती विचार । न धरवे साचार कृष्ण करीं ॥१॥ योगीयांचे ध्यानीं न सांपडे कांहीं । तया गोपिकाही धरुं म्हणतीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आपुल्या माहेरा जाईन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥१॥ सुख दुःख माझें ऐकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥१॥ आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपुल्या स्वहिता वाचेसी उच्चारा । आळस न करा क्षणभरी ॥१॥ जाईल हा देह वाउगाचि उगा । अभ्रांची छाया जयापरी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा