भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्या आम्ही पुसिलें नाही । तुज कांहीं कारणें

apulya amhi pusilen nahi | tuj kanhin karanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुल्या आम्ही पुसिलें नाही । तुज कांहीं कारणें॥१॥ मागें मागें धांवत आलों । कांहीं बोलों यासाटीं ॥ध्रु.॥ बहुत दिस होतें मनीं । घ्यावी धणी एकांतीं ॥२॥ तुका म्हणे उभा राहें । कान्हो पाहें मजकडे ॥३॥