भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य

apulen maran pahilen myan dolan | to jala sohala anupamya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥१॥ आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥ एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याचा त्यागें जाला सुकाळ हा ॥२॥ फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी जालों ॥३॥ नारायणें दिला वस्तीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥४॥ तुका म्हणे दिलें उमटोनि जगीं । घेतलें तें अंगीं लावूनियां ॥५॥