भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझें जड करुन घ्याल

apulya apan ugava ligad | kay majhen jad karun ghyal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझें जड करुन घ्याल ॥१॥ उद्धारासी काय उधाराचें काम । वाढवूं चि श्रम नये देवा ॥ध्रु.॥ करा आतां मजसाठी वाड पोट । ठावे नाहीं तंटे झालें लोकीं ॥२॥ तुका म्हणे बाकी झडलियावरी । न पडें वेव्हारीं संचिताचे ॥३॥