भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्या नामा आपण वाढवी । भक्तपणस्वयें मिरवीं । अवतार नाना दावीं । लाघव आपुलें

apulya nama apan vadhavi | bhaktapanasvayen miravin | avatar nana davin | laghav apulen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आपुल्या नामा आपण वाढवी । भक्तपणस्वयें मिरवीं । अवतार नाना दावीं । लाघव आपुलें ॥१॥ करी भक्तांचे पाळण । वाढवी त्यांचें महिमान । तयासी नेदी उणीव जाण । वागवी ब्रीद नामाचें ॥२॥ करी नीच काम नाहीं थोरपण । खाय भाजींचें आनंदें पान । तृप्त होय एका जनार्दनीं । तेणें समाधान होतसें ॥३॥