भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्या महिमानें । धातु परिसें केलें सोनें

apulya mahimanen | dhatu parisen kelen sonen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुल्या महिमानें । धातु परिसें केलें सोनें ॥१॥ तैसें न मनीं माझे आतां । गुणदोष पंढरिनाथा ॥ध्रु.॥ गांवामागील वोहोळ । गंगा न मनी अमंगळ ॥२॥ तुका म्हणे माती । केली कस्तुरीनें सरती ॥३॥