भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलेंनि रंगे येति होति साजणी

apulenni range yeti hoti sajani

आपुलेंनि रंगे येति होति साजणी । तंव वनवासीं एके आळंगिलेगे माये ॥१॥ बोलेंना बोलों देईना । तेथें पाहणें तें पारुषलेंगे माये ॥२॥ आपुलें केलें कांहींच नचले वो आतां । बापरखुमादेविवरा विठ्ठला देखतां ॥३॥