भजनी मालिका
← भजनांकडे परत

सगुन समान भजती अंतरीं । सर्व भूतांतरीं असे एक

sagun saman bhajati antarin | sarva bhutantarin ase ek

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सगुन समान भजती अंतरीं । सर्व भूतांतरीं असे एक ॥१॥ पाहा कोळियांची काय सांगों कीर्ति । विद्या अभ्यासिती मूर्तिपुढें ॥२॥ द्रोपदीचे घरीं होते उपवासी । देंटही लविती अकस्मात ॥३॥ नामा ह्मणे मुख्य प्रारब्ध कारण । पांडुरंगाविण गति नाहीं ॥४॥