भजनी मालिका
← भजनांकडे परत

सगुण निर्गुण कल्पनेचा भास । वस्तु अविनाश व्यापकत्वें

sagun nirgun kalpanecha bhas | vastu avinash vyapakatven

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सगुण निर्गुण कल्पनेचा भास । वस्तु अविनाश व्यापकत्वें ॥१॥ स्वानुभवें पाहीं लटिकें साच नाहीं । परिपूर्ण अवघाही आत्माराम ॥२॥ आपलाचि सादु अंतराळीं जेवीं । दुजेंवीण दावी दुजेंपण ॥३॥ लटिकें म्हणों जातां साच तया पोटीं । दर्पणींची भेटी आपणासवें ॥४॥ स्वप्नमाजी जेवीं नाना परिवार । प्रबोधीं साचार एकलाचि ॥५॥ निळा म्हणे रज्जू भासे सर्पपणें । झकविलें तेणें नेणतीया ॥६॥