भजनी मालिका
← भजनांकडे परत

सगुणाची शेज निर्गुणाची बाज

sagunachi shej nirgunachi baj

सगुणाची शेज निर्गुणाची बाज । सांवळी विराजे कृष्णमूर्ति ॥१॥ मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं । नित्यता पर्वणी कृष्णसुख ॥२॥ ह्रदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं । आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे ॥३॥ निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट । नित्यता वैकुंठ कृष्णसुखें ॥४॥