भजनी मालिका
← भजनांकडे परत

सगुण निर्गुण मूर्ति उभी असे विटे । कोटी सुर्य दांटे प्रभा तेथें

sagun nirgun murti ubhi ase vite | koti surya dante prabha tethen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सगुण निर्गुण मूर्ति उभी असे विटे । कोटी सुर्य दांटे प्रभा तेथें ॥१॥ सुंदर सगुण मूर्ति चतुर्भुज । पाहतां पूर्वज उद्धरती ॥२॥ त्रिभुवनीं गाजे ब्रीदाचा तोडर ॥ तोचि कटीं कर उभा विटे ॥३॥ एका जनार्दनीं नातुडे जो वेदां । उभा तो मर्यादा धरुनि पाठीं ॥४॥