भजनी मालिका

भजने

सकळांचें तुझ्या हातें असे सूत्र । यशोदेचा पुत्र न होशील ॥१॥ नंदाचिया ऋणा फेडाया आलासी । कळलें आम्हांसी तुझ्याकृपें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सकळिकां तेव्हां देवें आश्वासिलें । इंद्रें हें मांडिलें विघ्न येथें ॥१॥ महेंद्राच रंक करीन क्षणांत । पाहें पुरुषार्थ दावीन मी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सकळिकां नकस्कार करुनी यादवरावो । सांगे जीवींचा भावो तयांप्रती ॥१॥ तुमचे कृपादृष्टि करावें भोजन । येणें होईल संपूर्ण व्रतसिद्धी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सकळीं ध्याइला सकळीं पाहिला । परी असे भरला जैसा तैसा ॥१॥ युगानुयुगीं मीनले व्यापारी । परी न पवेचि सरी पुंडलीका ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सकळीक तीर्थे पाहतां डोळा । निवांत नोहे हृदयकमळा ॥१॥ पाहतां तीर्थे चंद्रभागा । सकळ दोष गेले । भंगा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सकळीच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सकाम निष्काम वदे नामावळी । सर्व दोषां होळी नाम मंत्रें ॥१॥ सोपाचि मंत्र नाहीं अवघड । तें जपा उघड रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सकाम निष्काम वाचे जपे नाम । तो माझा परम प्राणसखा ॥१॥ जीवाहूनि आवडता न करी जीवापरता । पूजी परम देवता भावें त्यासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ । झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरविती मयोरपत्रें मुगुट कुंडलें माळ ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम