भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकुमार साकार परिमळें आगळें

sakumar sakar parimalen agalen

सकुमार साकार परिमळें आगळें । कर्पुर परिमळें घोळीयेला ॥१॥ मित्रपणें करा मधुर आळुमाळा । मधुकर गोपाळा ह्रदयीं धरा ॥२॥ भवतरु भवमूळीं भवमूळ छेदन । तेंचि अंगीं चंदन लाविजेसु ॥३॥ बापरखुमादेविवरु सुकुमारु आगळा । वेदश्रुती बाळा वेधिलिया ॥४॥