भजनी मालिका
← भजनांकडे परत

सख्या पंढरीच्या नाथा । मज कृपा करीं आतां

sakhya pandharichya natha | maj krupa karin atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सख्या पंढरीच्या नाथा । मज कृपा करीं आतां ॥१॥ ऐसें करीं अखंडित । शुद्ध नेम शुद्ध व्रत ॥२॥ वेधु माझ्या चित्ता । हाचि लागो पंढरिनाथा ॥३॥ जीव ओंवाळुनी । जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥